Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Sunday, August 5, 2007

मन मन उधाण वाऱ्याचे...

मन मन उधाण वाऱ्याचे...

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ,

नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..

मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे ,

का होते बेभान कसे गहिवरते...

मन उधाण वाऱ्याचे ...

आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,

हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते ,

सावरते बावरते झडते अडखळते का पडते..

कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..

मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..

अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..

मन उधाण वाऱ्याचे...

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..

कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..

तळमळते सारखे नकळत का भरकटते..

कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा क चुकते..

भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..

उधाण वऱ्याचे..

No comments: