Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Sunday, August 5, 2007

संपूर्ण सीडी (६५० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन?

याहू असो की जीमेल, आणि हॉटमेल असो की आणखी कुठली वेबमेल असो, तुम्ही तुमच्या ईमेलला जास्तीत जास्त किती एम.बी . ची फाईल Attach करणार याला मर्यादा असते. ही मर्यादा सर्वत्र १० एम.बी. पर्यंतचीच असते. ज्यावेळी ह्या मर्यादेपेक्षा मोठी फाईल पाठवण्याची वेळ येते तेव्हा मार्ग खुंटलेला असतो. आजकाल लग्ना-मुंजीला व्हिडीओ शुटींग करण्याची पद्धत रूढ आहे. अगदी साधे फोटो घेतले तरी त्यांनी एक आख्खी सीडी भरलेली असते. अशी एखादी संपूर्ण सीडी समजा ईमेलला अटॅच करून पाठवायची आहे, तर काय करायचं? ते शक्य आहे का? शक्य असेल तर त्याला काही खर्च येईल का? खर्च येणार असेल तर तो किती? असे वेगवेगळे प्रश्न ही चर्चा उपस्थित झाल्याने तुमच्या मनात डोकावले असणार. तुमच्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं.१) संपूर्ण सीडीचा म्हणजे अदमासे ६५० ते ७०० एम.बी. चे व्हिडीओ शुटींग वा फोटोग्राफ्स वा कोणताही डेटा तुम्ही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा वापर करून पाठवू शकता. होय, ते सहज शक्य आहे. मी स्वतः अनेकदा असा डेटा पाठवला आहे. अजुनीही पाठवत असतो. २) असा १००० एम.बी. (होय, 1000 MB) पर्यंतचा डेटा पाठवायला शुन्य खर्च येतो. म्हणजेच, ही सुविधा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता. तुमची आख्खी सीडी कोणत्याही ईमेल पत्त्यावर अटॅच करून पाठवू शकता. आता तुमचा पुढला प्रश्न आहे- हे कसं करायचं?त्याचं उत्तरही सोपं आहे. हे काम पांडोकडून करून घ्यायचं.तुमचा परत प्रश्न येणार की हा पांडो कोण?पांडो हे नाव आपल्या पांडू हवालदारसारखं भारतीय वाटत असलं तरी हा पांडो भारतीय नाही. तो अमेरिकन आहे. तुम्हाला जास्त कोड्यात न टाकता सांगून टाकतो की पांडो हा अमेरिकन माणूस नसून ते एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर किंवा हा प्रोग्राम सर्वांसाठी मोफत आहे. तो उपलब्ध आहे http://www.pando.com/ ह्या साईटवर.

No comments: