Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 11, 2007

लव्हलेटर

लव्हलेटर

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असत
थेट जाऊन बोल्ण्यापेक्षा इजी आणि बेटर असत
गोड गुलाबी थडीतल गोड गुलाबी स्वेटर असत
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधल बटर असत

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉग असत
ज्यातला मेटर राईट आणि ग्रामर नेहमीच रॉग असत
सुचत नाही तेव्हा तुमच्या हाट्मधल पेन असत
आणि जेव्हा सुचत तेव्हा खिशात पेन नसत
पटल तर पप्पी आणि खटकल तर खेटर असत

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हबिट असत
वरती वरती लायन आतुन भेदरलेल रबिट असत
शेकी शेकी हातामधुन थरथरणारा वड असत
नुकतच पख फ़ुटलेल क्युट क्युट बड असत
होपफ़ुल डोळ्यामधल ड्राप ड्राप वॉटर असत !

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे अग्रिमेट असत
फ़िफ़्टी परसेट सेटल आणि फ़िफ़्टी जजमेट असत
ऑपोनटच्या स्र्टटेजीवर पुढच सगळ डिपेड असत
सगळा आसतो थेट सौदा काहीसुध्दा लेड नसत
हार्ट देऊन हार्ट घ्यायच सरळ साध बार्टर असत !

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असत
लाईफ़च्या पेस्ट्रीवरल स्वीट स्वीट क्रिम असत
अर्ध अर्ध प्याव अस शाहाळ्यामधल पाणी असत
तिसर्‍यासाठी नाही अस अगदी प्रायव्हेट मटर असत
दोघापुरतच बाधलेल सत्तर एम एम थिएटर असत

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे पहिला सिप असत
चवीसाठी आतुरलेल्या टीनएजरचा लिप असत
फ़ेसाळलेल्या नशिबासाठी हवाहवासा ग्लास असत
आऊट होतील त्याच्यासाठी दुसर्‍या दिवशी टास असत
जेपेल त्यानेच घ्यावी अस "विदाऊट पाणी क्वार्टर" असत!!!!

No comments: