Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 4, 2007

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,मी आणि माझी मैत्रीण हर्षदा जोशी, आम्ही दोघी मिळून संदीप खरे यांच्या 'नसतेस घरी तू जेव्हा....' या कवितेला थोड्या वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर आणत आहोत. यात कुणाचाही अपमान करण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.

नसतेस घरी तू जेव्हाजेवणही मीच बनवितो,

पोळ्यांचे होती नकाशे,भाजीही मी करपवितो.....

नसतेस घरी तू जेव्हासर्वत्रच होई पसारा,

धुळ मणामणांची साचे,कपड्यांचा होई ढिगारा.....

नसतेस घरी तू जेव्हाबिल लॉंड्रीचे हे येते,

वाणीही लावी तगादा,पाकीट रिकामे होते....

नसतेस घरी तू जेव्हामम इमेज हरवुन जाते,

ऑफिसला जातो तेव्हा,सर्वत्रच चेष्टा होते.....

नसतेस घरी तू जेव्हाभांड्यांचा होतो ढीग्,

मी घासत म्हणतो, सारेनशिबाचे असती भोग.....

नसतेस घरी तू जेव्हाटी.व्ही.ही मजेत असतो,

नसतात मालिका रडक्या,मी मला हवे ते बघतो......

नसतेस घरी तू जेव्हाजग सुनेसुनेसे भासे,

ना ओरडणे ना चिडणे,घर्-दार सुखावून जाते.....

नसतेस घरी तू जेव्हाजीव हा पोरका होतो,

दरक्षणी तुझ्या असण्याचा आभास बोलका होतो.........

No comments: