Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 4, 2007

पार्टीऑफ़िसमधे काल आमच्या

होती एक पार्टीजमली

फ़ुकट प्यायला रिकामटेकडी टाळकी

निमीत्त होते बाळुच्या साध्याशा बढतीचे

इतकी प्यायले इतकी प्यायले कारण विसरले पार्टीचे

एकाने धरला बाळुला दुसरयाने दीली थोबाडीत

तीसरा म्हणाला बाळुला तुला बदडुन काढीन

एकेकाचा अवतार बघुन बाळुची बसली वाचा

साला एवढे पैसे घालवुन परत नुसता लोचा

वेळ झाली जेव्हा शेवटच्या लोकलची

एकेकाची उतरु लागली आठवण येताच बायकोची

प्रत्येकाला घाई होती लवकर घरी पोचायची

बाळुला आली चक्कर बघुन रक्कम बिलाची

दुसरया दिवशी बाळुच्याटेबलावर एक कागद होता

बढतीची ऑर्डर कॅन्सल झालीकागद हसत सांगत होता

साहेबाने कालचा दावा बरोबर साधला होता

बाळु नेमका पार्टीमधे साहेबाला विसरला होता

No comments: