Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 11, 2007

पत्त्यांचा बंगला

पत्त्यांचा बंगला
-------------

खेळाला जाण.
देवाचि आण.
भलताच ताण.

पत्त्यांचा बंगला रचताना,
श्वासांचि वादळे आवरावी लागतात.
त्रिकोणी खोल्या जपताना,
थरथरणारी बोटे सावरावी लागतात.

डोळ्यात प्राण.
सतीचे वाण.
हरपलेले भान.

एक मजला पुर्ण होताच,
मन सोडते सुटकेचा खोल निश्वास.
वरती जाऊन कोसळताच,
पुन्हा एकवार डळमळतोच विश्वास.

गमावली शान.
घुसले बाण.
पुरी दाणादाण.

आशा निराशेचा लाटांवर,
झुलत झुलतच बंगला उभा केला.
थोडा आनंद मानेस्तवर,
हलक्याशा फुंकरीने कोसळुन गेला.

No comments: