Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Sunday, August 5, 2007

खर्‍या अर्थाने मोफत आणि उत्तम अँटी व्हायरस प्रोग्राम

अँटी व्हायरस प्रोग्राम्स - नॉर्टन पासून ते मॅकफीपर्यंत आणि बीटडिफेंडरपासून ते कॅस्परस्कीपर्यँत आपण ऐकलेले असतात, आणि कधीतरी ते ट्रायल व्हर्जन म्हणा किंवा कोणीतरी दिलेला पायरेटेड पिस आपण वापरलेलाही असतो. त्यात एक कायम म्हणावी अशा प्रकारची अडचण असते. ट्रायल व्हर्जन महिन्यानंतर किंवा विशिष्ट काळानंतर थांबतं. पायरेटेड प्रोग्राम म्हणाल तर ट्रायलची मुदत जरूर पार करतो, पण तोही काही काळानंतर थांबतो. कारण ती अँटी व्हायरस कंपनी तुम्हाला अपडेट देणं थांबवते. अशा वेळी आपण शोधात असतो एका उत्तम पण खर्या अर्थाने मोफत अशा अँटी व्हायरस प्रोग्रामच्या. वाचकहो, एओएल (अमेरिका ऑनलाइन वाले) कंपनीने एक उत्तम अँटी व्हायरस संपूर्ण जगाला मोफत उपलब्ध करून दिला आहे. तुम्हालाही तो मिळू शकेल. तो मध्येच थांबणार नाही. त्याचे अपडेटसही विनासायास आणि हक्काने मिळत राहतील. त्या अँटी व्हायरस प्रोग्रामचं नाव आहे - Active Virus Shield. हा अँटी व्हायरस दुसरा तिसरा काहीही नसून साक्षात Kasperaski Anti Virus आहे. इंटरफेस अगदी तोच. अगदी हुबेहुब. AOL ने दिलेला असल्याने आणि Kasperaski असल्याने तो तुम्ही रिलायबल मानायला हरकत नाही. मी स्वतः तो गेली काही महिने वापरतो आहे आणि तो अगदी व्यवस्थित सेवा देतो आहे. एओएल आणि कॅस्परस्की ह्या दोन कंपन्यांची मिळून ही देणगी आहे. तुम्हीही हवं तर तो डाऊनलोड करून पहा. त्यासाठी www.activevirusshield.com ह्या वेब साइटवर जा.तेथून मोफत डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी तुमचा ईमेल फक्त द्यावा लागेल. बाकी काहीही त्रास नाही. तुम्ही दिलेल्या मेल वर लायसन कोड पाठवला जाईल. तो वापरून इंस्टॉलेशन करा. ऑटोमेटिक अपडेटस ऑन करा. निर्धास्त रहा.

No comments: