Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Friday, August 10, 2007

Marathi kavita : हल्ली नाही कोणी बोलायला

हल्ली नाही कोणी बोलायला

ऑफिस मध्ये आल्यावरही
काम काही सूचत नाही
पण नुस्ताच पगार घेणे?
छे! छे! तेही मनाला रुचत नाही

म्हणून मी काही असाच
खुर्चीवर बसून रहात नाही
एक दोन कागद शोधून
करतोच एखादी तरी सही
आणि राहीली एखादी फाईल तरी
काम काही फार अडत नाही

हे मात्र खरं आहे हल्ली काम उकरुन पण
फार काही सापडत नाही
येणाऱ्या जाणऱ्यांना पकडून
मारतो गप्पा काहीच्या बाही
गप्पाही आता साऱ्या सरत आल्या
हल्ली नाही कोणी बोलायलाही

घरी गेल्यावर शॉवर घेउनही
मनाची तगमग काही कमी होत नाही
सायंकाळी वाईन ची बाटली
खुणावल्याशिवाय रहात नाही
मस्त दोन ग्लास झाल्यावर

काव्य पण लांब रहात नाही
लिहून असल्या या भिकार कविता
orkut वर सुद्धा मी
लोकांना सोडत नाही

No comments: