Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Friday, August 10, 2007

Marathi kavita जस्स च्या तस्स......

जस्स च्या तस्स.............!!!!!!!जस्स च्या तस्स.............!!!!!!!
जस्स च्या तस्स.............!!!!!!!

जस्स च्या तस्स राहील का सारं....?

हाक नुसती ऐकून थांबेल का वारं.......??

धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे

रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न ....काय हे?

सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,

आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप,ती दिड रुपया भाड्याची सायकल,

ब्रेकडांस व मूनवॉक करनारा तो मायकल...

पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग....?

अणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग....?आवडती छ्त्री हरवेल का परत..?

मोडतील का बेत आल्यावर ठरत..?

शाळेतली मैत्रीण परत मारेल का हाक..?

मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक...?ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट..?

आउट झालो कारण चांगली नव्हती बॅट..?

होईल का टिव्ही - "ब्लॅक ऍन्ड व्हाईट" चा "कलर"..?

पाहिल्यावर एकदम चोरेल का ती नजर...??"Ice-cream" ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...?

मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं..?जस्स च्या तस्स राहील का सारं....?

हाक नुसती ऐकून थांबेल का वारं..?

No comments: