Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Monday, September 3, 2007

अल्बम

आयुष्याच्या अल्बम मधे
आठवणींचे फोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटीव्ह शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळ्सने झोपले पाहिजे
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पहिले पाहिजे

आंघोळ फक्त 10 मिनिटे ?
एक दिवस तास द्यावा
आरशयासमोर सुन्दर
म्हणता यावे स्वताला

भसाडा का असेना
आपल्या सुरत रमता आले पाहिजे
वेडे वाकडे अंग हलवत
नाचता सुद्धा आले पाहिजे

कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे
तलावाच्या काठावर
उताने पडले पाहिजे

संध्याकाळी मंदिरा बरोबर
बागेत सुद्धहा फिरले पाहिजे
फूल पाखरांच्या सौदर्यला
कधी तरी भुलले पाहिजे

मात्र रात्री झोपताना
दोन मिनिटे देवाला द्या
एवढ्या सुंदर जगण्या साठी
नुसत thank you म्हणा

मित्राच्या मेल मधून

No comments: